Omicron : CM Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात नाईट कर्फ्यू? टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

Omicron : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बैठकीत २४ तासांत नियमावली तयार करण्याचे आदेश

सुधीर काकडे

मुंबई : राज्यातल्या कोविड (Covid19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स (Covid19 Task Force) सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीबाबत माहिती देताना सरकारी पत्रकात म्हटलंय की, पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काटेकोर सतर्कता आणि दक्षता ठेवण्यास सांगितलंय. तसेच त्यांनी केंद्राला राज्यांशी जवळून समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपायांना पाठिंबा देऊन सहकार्य करण्याबाबत देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. कोरोना रोगाविरूद्ध सक्रिय, लक्ष केंद्रित, सहयोगी आणि सहकारी लढ्यासाठी केंद्राची रणनीती आपल्या भविष्यातील सर्व कृतींना मार्गदर्शन करेल, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT