mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदे-भाजप ठाण्यातील वादाला आव्हाडांची फोडणी, ट्वीट केली ‘ती’ ऑडिओ क्लिप!

जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; ट्वीट केली ‘ती’ ऑडिओ क्लिप

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्या चर्चेत आलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावरून राजकारण रंगल्याचं दिसुन येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शेखर बागडे यांचं नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीटरवर शेअर केली आहे. ही ऑडिओ क्लिप शेखर बागडे यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

तर आव्हाड यांनी या ट्विटमध्ये कशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होतोय, यासंदर्भात त्यांनी ट्वीटमध्ये अनेक दावे केले आहेत. शेखर बागडे यांच्यावरून शिवसेना भाजप यांच्यातही मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर शिवसेना, भाजपामध्ये ज्या गोष्टीवरुन ठाण्यामध्ये वाद सुरु असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्वीट काय आहे?

“शिवसेना, भाजपामध्ये ज्या गोष्टीवरुन ठाण्यात वाद सुरु आहे; तो मानपाडा येथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे याच्यामध्ये प्रचंड पैशाचा उन्माद आहे. ‘मी त्यांना फाट्यावर मारतो’ हे त्याचे आवडते विधान. पैशाच्या मग्रुरीमुळे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसले आहे. आज अजित पवार यांनी त्याची प्रॉपर्टी वाचून दाखवली. ही प्रॉपर्टी त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीच्या २० टक्केही नाही. अजून तर त्याची खूप प्रॉपर्टी इकडे-तिकडे पसरलेली आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.(Latest Marathi News)

“खालापूर येथे एक फूड कोर्ट पेट्रोल पंप MSRDC ने ज्याच्या नावावर दिले होते त्याच्याकडून जबरदस्तीने पार्टनरशिप घेऊन शेखर बागडेनं मिळवलं. त्याला चेक दिला, पण नंतर त्या चेकचा व्यवहार पूर्ण न करताच ते फूड कोर्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूची सगळी जागा शेखर बागडेने बळकावली. प्रचंड दादागिरी करुन मूळ मालकास तेथे येण्यासही मज्जाव केला आहे. तो मूळ मालक तेथे गेल्यास स्थानिक पोलीसच त्या मूळ मालकाला अटक करतात. कारण बागडे साहेबांचा भाग आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“तिथे बाऊन्सर बसवले आहेत. तिथे गुंडांची ये-जा सुरु असते. आणि दिवसाला जवळ-जवळ २० ते २५ लाख रुपयांची कमाई तिथे होते. पेट्रोल पंपाचा चेक आणि सीसीडेचा चेक हा अधिकृत असल्याने मूळ मालकाच्या खात्यावर जातो. उर्वरीत संपूर्ण रोख पैसे बागडे आपल्या घरी घेऊन जातो. या सगळ्या प्रॉपर्टीवर कर्ज आहे. त्या कर्जाचा EMI मात्र त्या गरीब मालकाला भरावा लागतो”, असं आपल्या पोस्टमध्ये आव्हाडांनी नमूद केलं आहे.(Latest Marathi News)

“पोलीसांकडे अनेक तक्रार येतात. पोलीस त्याची दखलही घेतात. शेवटपर्यंत जातातही. परंतु त्यांना वरुन फोन येतो. आता वरुन फोन कोणाचा येतो हे देवेंद्रजी फडणवीस यांना वेगळं सांगायला नको. अशा या शेखर बागडेबद्दल अजित पवारांनी अनधिकृत संपत् बद्दल विषय काढला. त्यामुळे मी ही अधिकची माहिती महाराष्ट्राला देत आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना शेखर बागडे यांचा उल्लेख करत “शेखर बागडे ठाणे जिल्ह्यात काम करतोय, त्याने मोठी मालमत्ता निर्माण केली आहे. एक पोलीस एवढी बेहिशोबी मालमत्ता कशी काय गोळा करू शकतो? सरकारने यासंदर्भात चौकशी करावी”, सरकारचा दरारा असला पाहिजे, तोच राहिलेला नाही. कारण सगळ्यांनीच आओ-जाओ घर तुम्हाला अशा पद्धतीने भ्रष्टाचार करायला सुरुवात केली आहे”, असं अजित पवार म्हणाले होते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT