Chitra Wagh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : 'तो' फोटो शेअर करत शिवसेनेने डिवचलं; चित्रा वाघ उत्तर देत म्हणाल्या, कायम घरात बसून...

ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून पेटलेला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा उफळलेला वाद शांत झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी तो पुन्हा उकरून काढला आहे. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद हा वाद गेल्या काही दिवसांपासून शांत होता मात्र आज मनिषा कायंदे यांनी ट्विटर वर एका शरीर सौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

त्याला भाजपच्या चित्रा वाघ यांनीही त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता हा पुन्हा मिटलेला वाद पुन्हा उफाळून येणार असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे चित्रा वाघही संतापल्या आहेत. 2020 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरच्या गौरवप्रसंगीचा तो फोटो असून "भाजपच्या चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का? असं मनिषा कायंदे यांनी म्हंटलं आहे.

त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला मनिषा कायंदे ताई ? खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे, असो॰कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …?" असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी माध्यमांबरोबरच त्यानी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे अनेकांनी उर्फी जावेद हिच्याबरोबरच दुसऱ्या अभिनेत्रीच्या अंगप्रदर्शनावरतीही सवाल उपस्थित करून हे तुम्हाला चालतं का असा सवाल चित्रा वाघ यांना करण्यात आला आहे. आता मनिषा कायंदे यांनी ट्विटरवर त्यांना प्रश्न केला असला तरी आणि त्यांना चित्रा वाघ यांनी उत्तर दिल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, गॅस टंचाईचा जालन्यातील स्टील उद्योगालाही फटका...

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT