Sakal Karandak 2023 
महाराष्ट्र बातम्या

Sakal Karandak : ‘सकाळ करंडक’च्या बोधचिन्हाचे अनावरण

‘सकाळ करंडक एकांकिका स्पर्धे’च्या बोधचिन्हाचे रविवारी दिमाखात अनावरण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Karandak 2023

पुणे - ‘सकाळ करंडक एकांकिका स्पर्धे’च्या बोधचिन्हाचे रविवारी दिमाखात अनावरण करण्यात आले. सध्या रंगभूमीवर ‘हाउसफुल्ल’ गर्दीत सुरू असलेल्या ‘चारचौघी’ या नाटकाच्या प्रयोगातील मध्यंतरात ज्येष्ठ रंगकर्मी व स्पर्धेचे सांस्कृतिक दूत चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या पुनरागमनाची घोषणा केली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केल्यानंतर नाटकातील कलाकारांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण झाले.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, अभिनेते श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर याप्रसंगी उपस्थित होते. बोधचिन्हाचे अनावरण करून त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा म्हणजे रंगभूमीच्या भविष्याचा आरसा, असे म्हटले जाते. मराठी रंगभूमीवर आज कार्यरत असणारे अनेक कलाकार अशाच स्पर्धांच्या मुशीतून घडले आहेत. ‘चारचौघी’ या नाटकात आज काम करत असलेल्या कलाकारांनीही या स्पर्धा गाजवल्या आहेत’’

‘सकाळ करंडक’ ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असून यंदा ऑक्टोबरमध्ये तिचे आयोजन केले आहे. ‘रांजेकर रियल्टी’ स्पर्धेचे प्रायोजक आहेत. यंदा ही स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये रंगणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून, त्यातून निवडलेल्या सहा संघांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम फेरी रंगणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ७०३००२७०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. (Sakal Karandak Competition Contact Number)

स्पर्धेची वैशिष्ट्ये -

  • प्राथमिक, अंतिम, अशा दोन फेऱ्यांमध्ये स्पर्धा

  • दिग्गज कलाकारांकडून परीक्षण

  • स्पर्धेपूर्वी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन

  • स्पर्धेतील आश्वासक कलाकारांना स्पर्धेनंतरही मार्गदर्शन

  • यापूर्वी कुठेही सादर न झालेली एकांकिका पाहण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT