One crore people in state without vaccination solapur mumbai thane pune raigad corona  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात एक कोटी व्यक्ती लसविना

सात दिवसांची मुदत; दुसरा डोस घेण्यात १७ जिल्हे पिछाडीवर

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, मीरा -भाईंदर या ठिकाणी कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. तीन लाटा येऊन गेल्यानंतरही राज्यातील एक कोटी नऊ लाख व्यक्तींनी अद्याप लशीचा एकही डोस घेतलेला नाही तर पावणेतीन कोटी व्यक्तींनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यात १२ ते १८ वयोगटातील सर्वाधिक तरुण असल्याची बाब समोर आली आहे. त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांनी ना मास्क वापरला ना लस घेतली. राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नगर, उस्मानाबाद, वाशीम, जालना, यवतमाळ, लातूर, बुलडाणा, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अजूनही ३० ते ४८ टक्के व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. १२ ते १४ वर्षे वयोगटातील १७ लाख, १५ ते १८ वर्षे वयोगटातील २१ लाख तरुणांनी आणि १८ वर्षांवरील ७० लाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

राज्यात चार दिवसांत आढळलेल्या कोरोनारुग्णांत नवीन व्हायरसची लक्षणे आहेत. त्यातील ८० टक्के रुग्णांवर घरी उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील बहुतेकांना तीव्र लक्षणे नाहीत, अशी माहिती आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी दिली.

रुग्णवाढीचा अंदाज घेऊन संबंधित ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लागू होतील. सर्वांनी मास्क वापरणे प्रतिबंधित लस घेणे यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, कृती दल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT