TULJA.jpg
TULJA.jpg 
महाराष्ट्र

तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : आई राजा उदो-उदोच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमून गेली आहे. तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. रविवारी (ता. 13) तुळजापूर शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहेत.

तुळजाभवानी मातेची अश्विनी पौर्णिमा यात्रा रविवारी असल्यामुळे शनिवार (ता. 12) रात्रीपासूनच भाविक शहरात दाखल होण्यास सुरवात झाली होती. त्यात विविध भागांतून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर आधिष्ठीत करण्यात आली. त्यानंतर अभिषेक होऊन धुपारती झाली.

पहाटे सहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजा सुरू झाली. नऊ वाजेपर्यंत अभिषेक तसेच धुपारती झाली. साडेअकराच्या सुमारास सोलापूर येथील मानाच्या काठ्या शहरात दाखल झाल्या. शहरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. 

दरम्यान, पहाटेपासून दर्शन घेतल्यानंतर भाविक परतीच्या मार्गाला लागले. एसटी महामंडळाने जवळपास एक हजार 200 बसची सोय केली आहे. तरीही या बस अपुऱ्या ठरत असल्याचे चित्र होते. अनेक भाविक बसच्या टपावरून प्रवास करीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT