कांदा ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

कांदा आता प्रतिक्विंटल सरासरी १५०० रुपये! गुरुवारी सोलापूर बाजार समितीत २०९ गाड्यांची आवक; एक महिन्यात ५० कोटींची उलाढाल

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ११) २०९ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. शुक्रवारी साडेआठशे ते एक हजार रुपयांपर्यंत सरासरी भावाने विकलेला कांदा आता सरासरी १३०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ११) २०९ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. शुक्रवारी साडेआठशे ते एक हजार रुपयांपर्यंत सरासरी भावाने विकलेला कांदा आता सरासरी १३०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. पाच दिवसांत प्रतिक्विंटल ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

सोलापूर बाजार समितीत गुरुवारी विकलेल्या २० हजार ९५८ क्विंटल कांद्यातून दोन कोटी ७२ लाख ५४ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली. आता कांद्याचा भाव वाढू लागला आहे. कारण, मागील काही दिवसांपासून वाळलेला आणि बिगरडागी कांदा विक्रीसाठी येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, मंगळवेढा या तालुक्यांमधून सुमारे ७० ते ८० ट्रक कांदा येत आहे.

याशिवाय धाराशिव जिल्ह्यातून विशेषत: तुळजापूर तालुक्यातून आणि बीड, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांतूनही कांदा विक्रीसाठी येत आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १५ हजार हेक्टरवरील कांदा जागवेरच खराब झाला. नोव्हेंबरमध्ये पावसात भिजलेला कांदा बाजारात विक्रीसाठी येत होता. त्यामुळे सुरवातीला कांद्याचा सरासरी भाव ९५० ते १२०० रुपयांपर्यंतच होता. आता गुणवत्तापूर्ण कांदा येत असल्याने भावात सुधारणा होऊ लागली आहे.

दररोज सकाळी १० वाजल्यापासून लिलाव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री उशिरापर्यंत कांदा विक्रीसाठी येतो. दररोज सकाळी १० वाजल्यापासून बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरु होतो. दरम्यान, कांद्याचा सिझन नसला तरी देखील बाजार समितीत १०० व्यापारी असतात. पण, आता हंगाम सुरु झाल्याने ७५ ते ८० व्यापाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

परराज्यातून कांद्याची वाढली मागणी

पावसाळा संपला, अवकाळीची भीतीही संपली. आता कांद्याची मागणी वाढू लागली आहे. बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा विक्रीसाठी येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितील कांद्याला कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, बांग्लादेशाच्या सीमेवर मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे बाजार समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd T20I: तिलक वर्मा एकटा लढला, वादळी फिफ्टीही ठोकली; पण टीम इंडिया ऑलआऊट अन् द. आफ्रिकेचा मोठा विजय

Modi hosts Dinner for NDA MPs : मोदींकडून 'NDA' खासदारांसाठी पंतप्रधान निवासस्थानी विशेष भोजनाचे आयोजन

Viral : किती खाणेरडापणा! 19 मिनिट 30 सेकंद व्हिडिओचा पार्ट 2 व्हायरल? शेअर होतीये लिंक; पोलिसांची वॉर्निंग

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

SCROLL FOR NEXT