zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

नवोदय परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्‍यास सुरवात! २९ जुलैपर्यंत आहे अर्ज भरण्याची मुदत; ‘या’ संकेतस्थळावर भरता येईल अर्ज

जवाहर नवोदय विद्यालयातील (नवोदय) प्रवेशासाठी दरवर्षी परीक्षा घतली जाते. परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २९ जुलैपर्यंत आहे. या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयातील (नवोदय) प्रवेशासाठी दरवर्षी परीक्षा घतली जाते. सध्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २९ जुलैपर्यंत आहे. या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

‘नवोदय’च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची जन्मतारीख १ मे २०१४ ते ३१ जुलै २०१६ दरम्‍यान असावी, अशी अट आहे. तसेच सध्या विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्‍ये शिकत असावा, इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी ग्रामीण कोट्यातून प्रवेशासाठी पात्र असणार आहे. शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येईल. पण, त्यांच्यासाठी २० टक्केच जागा असतात.

दरम्यान, ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. त्यात बुद्धिमत्ता चाचणी ५० गुण, गणितसाठी २५ व भाषेसाठी २५ गुण (मराठी पर्याय उपलब्ध), अशी एकूण १०० गुणांची परीक्षा होणार आहे. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असतो. मुली, ग्रामीण विद्यार्थी एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT