Teacher Eligibility Test

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

‘टीईटी’त १० टक्केच उमेदवार उत्तीर्ण! एका गुणाने नापास झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ‘ही’ मागणी; पुढची ‘टीईटी’ जूनमध्ये, वाचा...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अवघे १० टक्केच उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी ८३ गुण (५५ टक्के) आवश्यक आहेत, पण दीड ते दोन हजार उमेदवार अवघ्या एका गुणाने (०.३३ टक्के) अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी एक गुण वाढवून देण्याची मागणी केली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. अवघे १० टक्केच उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी ८३ गुण (५५ टक्के) आवश्यक आहेत, पण दीड ते दोन हजार उमेदवार अवघ्या एका गुणाने (०.३३ टक्के) अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी एक गुण वाढवून देण्याची मागणी परिषदेकडे केली आहे. त्यावर शिक्षण सचिव, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निर्णय होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’चे बंधन घातले. उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली. २३ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या ‘टीईटी’साठी राज्यातील पावणेपाच लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यात पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी दोन लाख तीन हजार आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी पावणेतीन लाख उमेदवार होते. त्यात अंदाजे ५५ ते ६५ हजार शिक्षकही होते.

१० टक्के उत्तीर्ण झालेल्यांमध्ये शिक्षकही आहेत, उत्तीर्ण झाल्याचा आनंद शिक्षकांनी पेढे वाटून साजरा केला. दरम्यान, एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी यापूर्वी एक गुण वाढवून दिल्याचे सांगत आताही तसाच निर्णय घेण्याची मागणी परिषदेकडे केली आहे. त्यावर आता मागील रेकॉर्ड पडताळून शिक्षण खात्याचे सचिव, शिक्षण आयुक्त व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष निर्णय घेणार आहेत.

एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्यांकडून उत्तीर्ण करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दीड महिन्यांतच शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर केला आहे. आता या आठवड्यात अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाईल. काही उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी एक गुण कमी पडल्याने त्यांनी उत्तीर्ण करण्याची मागणी नोंदविली आहे. अनेकांनी यापूर्वी काटावरील उमेदवारांना एक गुण दिला होता, असेही म्हटले आहे. त्याची माहिती घेतली जात आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

जून महिन्यात पुढची ‘टीईटी’; शिक्षकांना उत्तीर्णसाठी सहा संधी

सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील प्रत्येक शिक्षकास (ज्यांच्या निवृत्तीला पाच वर्षे शिल्लक आहेत असे वगळून) दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. ३० जुलै २०२७ पर्यंत ही मुदत आहे. या दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तीन परीक्षा होतील. केंद्राच्याही दोन-तीन परीक्षा या काळात होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी पाच ते सहा संधी मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : बापरे! आज अचानक सोनं-चांदी इतकी का वाढली? चांदीने तर इतिहास रचला; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

छावा सिनेमावर टीका केल्यानं ए. आर. रहमान वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्री कंगना राणौत पोस्ट शेअर करत म्हणाली...'तुमच्यासारखा माणूस...'

Pollution : ‘प्रदूषणामुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू’; जागतिक बँकेच्या अहवालावरून जयराम रमेश यांची केंद्रावर टीका

Kolhapur ZP Election : अर्ज भरण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक; झेडपी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर शक्य!

जय शाह संतापले, बांगलादेशला फायनल वॉर्निंग! गप्प खेळा, अन्यथा T20 World Cup मधून बाहेर फेकू, बदल्यात 'या' संघाला खेळवण्याची तयारी

SCROLL FOR NEXT