मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार sakal
महाराष्ट्र बातम्या

रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात ५१ टक्केच पेरणी! ज्वारीच्या कोठारात सव्वातीन लाख हेक्टरपैकी १.८६ लाख हेक्टरवर ज्वारी; गहू, ज्वारी महागणार

पावसाअभावी यंदा रब्बीच्या जिल्ह्यात चार लाख ६० हजार ९१८ हेक्टर (ऊस वगळून) क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ दोन लाख ३७ हजार ६०२ हेक्टरवरच (५१.५५ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा व गळीत धान्य आणि कडधान्याची पेरणी खूपच कमी आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाअभावी यंदा रब्बीच्या जिल्ह्यात चार लाख ६० हजार ९१८ हेक्टर (ऊस वगळून) क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ दोन लाख ३७ हजार ६०२ हेक्टरवरच (५१.५५ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा व गळीत धान्य आणि कडधान्याची पेरणी खूपच कमी झाल्याची वस्तुस्थिती कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात ४३ साखर कारखाने आहेत. रब्बीच्या जिल्ह्यात तब्बल दीड लाख हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. हमीभावाची वाट न करता कमी खर्चात व कमी जोखमेत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाकडे पाहू लागला आहे. ना अवकाळी ना अतिवृष्टीची चिंता, अशा या उसाला फक्त दुष्काळातच सर्वाधिक फटका बसतो.

तीन-चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या तालुक्यात बराच अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस ज्वारी, गहू अशा पिकांसाठी लाभधारक आहे, पण फुलोऱ्यातील द्राक्ष व डाळिंब, कांदा, भाजीपाल्यासाठी घातक आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नाही, असा कृषी विभागाचा रिपोर्ट आहे. पण, अशा अवकाळीमुळे पिकांवरील रोगराई वाढण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केल्याचे चित्र आहे. पावसाअभावी खरीप वाया गेला, आता अवकाळीमुळे रब्बीतील पिकांचे नुकसान होवू नये म्हणून शेतकरी परिश्रम घेत आहे.

बहुपिक पद्धतीच हवामान बदलावरील ठोस उपाय

यंदा शेतीला पूरक असा पाऊस नाही, अशीच स्थिती आहे. जून- जुलैत पावसाचा खंड, पुन्हा जोरात पाऊस आणि पुन्हा मोठा खंड, शेवटी परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान बदलाचा अंदाज घेऊन आता बहुपीक पद्धतीचा अवलंब करून एकच पीक न लावता सतत त्यात बदल करावा. जेणेकरून जोखीम कमी होईल आणि त्यातून फायदाही मिळेल. नुकताच पडलेला अवकाळी पाऊस काही पिकांसाठी फायद्याचाच आहे, पण फुलोऱ्यातील द्राक्ष, डाळिंबासाठी घातक आहे.

- डॉ. सतीश करंडे, हवामानशास्त्रज्ञ, सोलापूर

गहू, ज्वारीचे दर वाढणार

यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपातही अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आता रब्बीच्या पेरण्याही कमीच असल्याने आगामी काळात ज्वारी व गव्हाचे दर निश्चितपणे वाढतील, अशी स्थिती आहे. पाच ते सात हजारांहून अधिकचा दर राहू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे तीन लाख १८ हजारांवर क्षेत्र आहे, पण सध्या एक लाख ८७ हजार हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र ४२ हजारांवर आहे, पण पेरणी केवळ साडेचार हजार हेक्टरवरच झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Nobel Prize in Medicine 2025: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर! मेरी ई. ब्रन्को, फ्रेड रॅम्सडेल अन् शिमोन सकागुची ठरले पुरस्काराचे मानकरी

Vijay Deverakonda Accident:'डोक्याला मार लागलाय', अपघातनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया, म्हणाला...'दुखतय पण...'

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur Lodge Raid : गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्...

SCROLL FOR NEXT