zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार इयत्ता पहिलीत प्रवेश, अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार, वाचा...

इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ रोजी त्या विद्यार्थ्याचे सहा वर्षे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. सर्व प्राथमिक शाळांनी अशा विद्यार्थ्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ रोजी त्या विद्यार्थ्याचे सहा वर्षे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. सर्व प्राथमिक शाळांनी अशा विद्यार्थ्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ आणि खासगी प्राथमिक शाळा आहेत. दुसरीकडे खासगी प्राथमिक शाळांची संख्या ३५२ आहे. या शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे वर्ग, तुकड्या आहेत. दरवर्षी अंतिम सत्र परीक्षा संपण्यापूर्वीच शिक्षक पटसंख्येची जुळवाजुळव करतात, जेणेकरुन विद्यार्थ्यांअभावी शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत हा हेतू असतो. गुणवत्तेच्या जोरावर यंदा जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

हाच धागा पकडून आतापासूनच जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षक इयत्ता पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील चिमुकली पहिलीच्या वर्गात दाखल होतात. त्यांना प्रवेश देताना ३१ डिसेंबर २०२६ रोजी तो विद्यार्थी सहा वर्षांचा व्हायला पाहिजे. एक-दोन महिने कमी असतील तर त्यांना पहिलीत प्रवेश देता येणार नाही, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल आहे.

समायोजन, बदल्या अन्‌ शिक्षक भरती १५ जूनपूर्वी

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता आता अंतिम झाली आहे. संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर रिक्त शिक्षकांची पदे भरली जातील. शेवटी शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या होतील. दरम्यान, आता संपूर्ण जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदल्या एकदम होणार नाहीत. ज्या जिल्ह्यांची संचमान्यता, अतिरिक्त समायोजन वेळेत होईल, त्या जिल्ह्यांमधील बदल्या लगेच होणार आहेत. समायोजन, भरती आणि बदल्या या तिन्ही प्रक्रिया ३१ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागाने केले आहे.

शाळांनी आदेशानुसार नियोजन करावे

३१ डिसेंबर २०२६ रोजी ज्या विद्यार्थ्यास सहा वर्षे पूर्ण होतात, त्यांनाच २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देता येईल. गतवर्षीप्रमाणेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होतील. त्यादृष्टीने शाळांनी परीक्षेचे नियोजन करायचे आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT