Rohit Pawar on early morning oath ceremony of Ajit Pawar and Devendra Fadnavis
Rohit Pawar on early morning oath ceremony of Ajit Pawar and Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र

Rohit Pawar News : "पहाटेच्या शपथविधिबद्दल दोनच नेते सांगू शकतात"

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar News: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. नेमक्या कोणाच्या निर्णयावरून पवार आणि फडणवीस यांनी स्थापन केलेलं सरकार कोसळलं हा चर्चेचा विषय ठरला आहे.

या शपथविधीबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी होती असं म्हंटलं, त्यानंतर आता काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केलं.

फडणवीस यांच्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेत असल्याचं पवार यांनी म्हंटलं आहे. तर त्या दिवशी काय घडलं होतं, ते फक्त दोन नेते सांगू शकतात.

अजित पवार आणि शरद पवारच पहाटेच्या शपथविधी बद्दल सांगू शकतात. मात्र फडणवीस हे सध्या जे वक्तव्य करत आहेत, ती अत्यंत दुटप्पी भूमिका असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटंलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, "त्या दिवशी काय घडलं हे अजितदादा आणि पवार साहेबच सांगू शकतात. फडणवीस साहेब मोठे नेते आहेत मी त्यांच्या अनुभवाचा आदर करतो.

मात्र ते म्हणाले होते काही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार नाही, राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार असं म्हटले या वक्त्यामध्ये कुठेतरी गल्लत होतं आहे.

शिवसेना फुटली तेव्हा ते म्हणाले ते शिवसेना फोडण्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही. मात्र विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेना फोडण्यामागचे कलाकार कोण होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हसतच प्रतिक्रिया दिली.

अशी दुटप्पी भूमिका एवढ्या मोठ्या नेत्याची येते याच मला आश्चर्य वाटतं. येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गटाला अपेक्षित यश मिळणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत त्यामुळे ते सहानुभूति मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत का असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT