solapur mahapalika sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ नगरसेवक विजयी झाल्यानंतर आता ‘स्वीकृत’ सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपला नऊ स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार आहे. यासाठी तब्बल ५६७ इच्छुकांनी शहराध्यक्षांकडे अर्ज केले आहेत. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी उपमहापौर पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्‍चित मानली जात आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ नगरसेवक विजयी झाल्यानंतर आता ‘स्वीकृत’ सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपला नऊ स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार आहे. यासाठी तब्बल ५६७ इच्छुकांनी शहराध्यक्षांकडे अर्ज केले आहेत. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी उपमहापौर पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्‍चित मानली जात आहेत. उर्वरित सात जागांवर नव्या चेहऱ्यांना, तसेच विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन संधी दिली जाणार आहे. महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असून त्यापूर्वी स्वीकृत सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.

विधानसभेची निवडणूक होऊन सव्वा वर्ष झाले आहे. नोव्हेंबर २०२९ मध्ये पुढील विधानसभा निवडणूक होईल. या निवडणुकीत शहरात भाजपलाच सर्वाधिक लाभ होईल, यादृष्टीने पक्षातील सक्रिय सदस्यांना ‘स्वीकृत’ची संधी मिळणार आहे. जेणेकरून भाजपच्या आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल हा हेतू असणार आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत सुमारे ११०० जणांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या होत्या मात्र सर्वांना संधी मिळू शकली नाही. त्यात आमदार, पक्षातील ज्येष्ठांचा शब्द पाळून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षासाठी प्रामाणिक काम केलेल्यांची नावे ‘स्वीकृत’साठी आघाडीवर आहेत. २० फेब्रुवारीला नूतन नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. यावेळी ‘स्वीकृत’ नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील. तत्पूर्वी, अनेक इच्छुकांनी आमदारांच्या शिफारसी जोडून ‘स्वीकृत’साठी अर्ज केले आहेत. त्यातून कोणाला लॉटरी लागणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

माजी उपमहापौर पद्माकर काळेंना का संधी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहरातील नेते माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना भाजपने उमेदवारी दिली, पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. तत्पूर्वी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना निवडणुकीत अपयश आल्याने त्यांच्या मनात पराभवाची सल कायम आहे. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकाची संधी मिळू शकते. जेणेकरून, मतदानाच्या आदल्या दिवशी अमोल शिंदे यांनी आमदार कोठेंवर केलेल्या आरोपाचे (मराठा नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न होतोय) खंडन होईल.

‘स्वीकृत’चे असणार असे निकष

  • पक्षातील सक्रिय सदस्य, पक्ष संघटन, मजबुतीसाठी सतत काम करणारा सदस्य

  • ज्या इच्छुकाच्या मागे जनाधार आहे, पण आरक्षणामुळे उमेदवारी मिळू शकली नाही

  • तिन्ही आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये स्वीकृत सदस्याचा अधिक लाभ होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

West Bengal Political Crisis : ममतांना मोठा धक्का, 60 बंडखोरांनी मांडली वेगळी चूल; गटनेते पदी ऋतब्रत यांची निवड, पक्ष चिन्हावरही केला दावा

दक्षिण मुंबईत वीज संकट! BEST अ‍ॅक्शन मोडमध्ये; 690 कर्मचाऱ्यांची भरती होणार, वारंवार बत्तीगुल होत असल्याने मोठा निर्णय

इतके उद्योग करूनही 'कमळी' अखेर परीक्षेत पास झालीच; किती टक्के मिळाले माहितीयेत? प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का

Latest Marathi News Live Update : टोमॅटो कॅरेटच्या वादातून फेरीवाल्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT