Badlapur School Case sakal
महाराष्ट्र बातम्या

Badlapur School Case : ‘महाराष्ट्र बंद’ची शनिवारी हाक

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

‘बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यातील महिला आणि  मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या बंदमध्ये राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

शाळेतील सफाई कामगाराने दोन निरागस मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी बदलापूरमध्ये उमटले होते. प्रक्षुब्ध जमावाने रेल्वे स्थानकात आंदोलन करत रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. राज्य सरकारला या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीत विधानसभेच्या  जागावाटपाची चर्चा रद्द करून  राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा केली.

या चर्चेअंती २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘‘ दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केले . पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात बाल अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजप महायुतीचे युतीचे सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट असून या सरकारला जागे करण्यासाठी २४ तारखेला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. या बंदमध्ये ‘मविआ’मधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत.

बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा,’’ असे आवाहन पटोले यांनी केले. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत उपस्थित होते.

बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासल्या गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि  मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- नाना पटोले,

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT