Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

'सडक्या मनोवृत्तीच्या लोकांकडून शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली'

देवेंद्र फडणवीस : सडक्या मनोवृत्तीच्या लोकांकडून उपद्रव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ‘‘शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करून सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असे वाटते की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही सडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटे ठरवीत आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असे काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,’’ असे विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘‘संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्या ही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचे कुठलेही नुकसान भाजपला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते,’’ असेही फडणवीस म्हणाले.

राजकारण करणारे उघडे पडतील

ते यासंदर्भात पुढे म्हणाले, की मला संभाजीराजे छत्रपती भेटले होते. त्यापूर्वीच त्यांनी मी कुठल्याही पक्षाचे तिकीट न घेता स्वतंत्र निवडणुकीला उभा राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. माझी अपेक्षा आहे की घराण्याची परंपरा पाहता मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातून भाजपने आम्हाला समर्थन देऊन त्या पदावर बसवले. तसेच सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिले पाहिजे. सगळे समर्थन देणार असते तर त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल मी जरूर हायकमांड सोबत चर्चा करीन असे आश्वासन दिले होते. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटायचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Sangola Murder Case: मुलानेच केला जन्मदात्याचा खून; सांगोला तालुक्यात उडाली खळबळ, आईची फिर्याद, धक्कादायक कारण आलं समाेर!

Latest Marathi News Live Update : मुंबईत दोनदिवसीय 'भक्तीचा महाकुंभ’; 'भक्ती-शक्ती व्यासपीठा'तर्फे संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाची संधी

Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

SCROLL FOR NEXT