Sindhudurg chipi Airport esakal
महाराष्ट्र बातम्या

पत्रिकेवर नाव नसलं, तरी देवेंद्रंचं नाव जनतेच्या मनात कायम : दरेकर

भाजपचा चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे (Sindhudurg chipi Airport) उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी होत आहे.

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे (Sindhudurg chipi Airport) उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) या दोघांनाही अद्याप मिळालेलं नाही. प्रवीण दरेकर यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीय. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती स्वत: प्रवीण दरेकर यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या नंबरला असल्यामुळे पत्रकार परिषदेत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.

दरेकर पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं विमानतळाच्या बांधकामात मोठं योगदान असतानाही त्यांचं पत्रिकेत नाव नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, की हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असते. प्रत्येक ठिकाणी राजकारण करतंय. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच, परंतु आतापर्यंत या कार्यक्रमाचं निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेलं नाही, अशी जाहीर नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

साहेबांचं नाव पत्रिकेवर असो अथवा नसो, परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर त्यांचं नाव कोरलं गेलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक झाल्या, त्यात देवेंद्रंच्या नेतृत्वावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय. विरोधी पक्षात असूनही सर्वाधिक मोठं यश भाजपला मिळालंय. त्यामुळं पत्रिकेवर नाव नसलं, तरी देवेंद्रचं नाव जनतेच्या मनात कायम आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT