Maratha Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : आरक्षण बैठकीस विरोधकांची दांडी

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशन कालावधीत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलाविली असून विरोधकांनी मात्र त्या बैठकीस जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशन कालावधीत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलाविली असून विरोधकांनी मात्र त्या बैठकीस जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. ‘‘आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी काय चर्चा केली? हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे.

या प्रकरणी राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडी बैठकीला जाणार नाही. राज्य शासनाने आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी,’’ अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपली भूमिका मांडताना याआधीही अशी बैठक झाली होती त्यावेळी आम्ही सर्वजण त्या सर्वपक्षीय बैठकीत सामील झालो होतो त्यावेळी चर्चाही झाली होती असे सांगितले. ‘‘ सभागृहात या विषयावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे. त्यामुळे आम्ही नवीन काय बोलणार? आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे हा आरक्षणाचा विषय सत्ताधाऱ्यांनी योग्य पद्धतीने सोडवावा,’’ असे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT