dj free solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरात डीजे अन्‌ लेझर लाईट्सवर बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार 'बीएनएस' २०२३ मधील कलम १६३ नुसार कारवाई, वाचा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा, सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जयंती मिरवणुकांमध्ये उच्च क्षमतेच्या डीजे साऊंड सिस्टीम, प्रखर बीम लाईट, प्लाझ्मा आणि लेझर लाईट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातल्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहेत

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा, सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जयंती मिरवणुकांमध्ये उच्च क्षमतेच्या डीजे साऊंड सिस्टीम, प्रखर बीम लाईट, प्लाझ्मा आणि लेझर लाईट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातल्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहेत. यापूर्वी देखील महापुरुषांच्या जयंती, सण-उत्सवात देखील असे आदेश काढले होते.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशानुसार ‘डीजे’ व लेझर लाईटवरील निर्बंध १ ते ९ ऑगस्टपर्यंत असणार आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये पोलिस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. विशिष्ट सार्वजनिक मंडळे मिरवणुकीदरम्यान प्रचंड आवाजाच्या ‘डीजे’ सिस्टीमचा वापर करतात. त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सामान्य लोकांना कानाचा आणि छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, प्रखर लेझर व प्लाझ्मा बीम लाईट्समुळे दृष्टी कायमची जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व बाबींची दखल घेत पोलिस आयुक्तांनी सोलापूर शहरात ‘डीजे’ बंदीचा निर्णय घेतला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

डीजे व प्लाझ्मा लाईट्स, बीम लाईट्स आणि लेझर लाईट्सवरील बंदीचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहेत. आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास व्यक्ती किंवा आयोजक, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आदेशातून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT