wadia-hospital
wadia-hospital 
महाराष्ट्र

"वाडिया'ला 24 तासांत निधी देण्याचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  पुतळ्यांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत; मात्र आरोग्यसेवेसाठी नाहीत. पुतळे महत्त्वाचे आहेत की रुग्णालये, असा खडा सवाल गुरुवारी (ता. 16) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला. वाडिया रुग्णालय ट्रस्टला 24 तासांत निधी देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. 

लहान मुले आणि महिलांसाठी असलेल्या वाडिया रुग्णालयापुढे निधीची अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे व्यवस्थापनावर रुग्णालय बंद करण्याची नामुष्की आली आहे. याबाबत गुरुवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महापालिकेकडून वाडिया रुग्णालयाला 14 कोटी आणि सरकारकडून 24 कोटी रुपये मंजूर झाले असून, ही रक्कम तीन आठवड्यांत देण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील गिरीश गोडबोले यांनी दिली; मात्र खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. आंबेडकरांनी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व केले त्यांचे काय? त्यांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांचे काय? असे सवाल खंडपीठाने केले. आजारातून बरे होण्यासाठी रुग्णालये उपयुक्त आहेत की पुतळे, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली. 

याप्रकरणी शुक्रवारी (ता. 17) पुन्हा सुनावणी होणार असून, सर्व मंजूर निधी कधीपर्यंत दिला जाईल, याची माहिती राज्य सरकार देणार आहे. याचिकादार दीपेश सिरोया यांनी वाडिया ट्रस्टद्वारे चालणाऱ्या रुग्णालयांच्या अडचणींबाबत न्यायालयात जनहित याचिका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT