biometric attendance compulsory sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन; ‘प्रवेश कॉलेजमध्ये पण उपस्थिती क्लासलाच’; आता बोर्ड परीक्षेला येणार अडचण

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. दरम्यान, ‘कनिष्ठ महाविद्यालयात ‘विज्ञान’ शाखेत प्रवेश घ्यायचा आणि खासगी कोचिंग क्लास जॉईन करायचा’ हा नवा पॅटर्न आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. दरम्यान, ‘कनिष्ठ महाविद्यालयात ‘विज्ञान’ शाखेत प्रवेश घ्यायचा आणि खासगी कोचिंग क्लास जॉईन करायचा’ हा नवा पॅटर्न आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थित कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असून त्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही लावावेत असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक पालक नीट, सीईटीच्या तयारीसाठी आपल्या मुला-मुलीचा प्रवेश पालक कोणत्यातरी कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित करतात. त्याठिकाणी डोनेशन (‘विनाअनुदानित’साठी) स्वरूपात देखील काही प्रमाणात रक्कम दिली जाते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व अंतर्गत परीक्षा व बोर्ड परीक्षेलाच यायचे अशी सवलत दिली जाते. कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्याठिकाणी दररोज येत नाहीत, पण कोचिंग क्लाससाठी मात्र नियमित जातात अशी स्थिती आहे.

कोचिंग क्लास कोणीही लावावा, पण महाविद्यालयाच्या वेळेत किंवा महाविद्यालयात न जाता नको, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी स्टेट बोर्डाऐवजी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) अभ्यासक्रम लागू करावा, अशी पालकांची मागणी आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीची परीक्षा सोपी जाईल, असा त्यामागील हेतू आहे.

माध्यमिक शाळांना आदेश, आता कनिष्ठ महाविद्यालयांची अचानक तपासणी

इयत्ता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असेल. दोन्ही वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. माध्यमिक शिक्षण विभागाच्या पथकांकडून कनिष्ठ महाविद्यालयांची अचानकपणे तपासणी होईल, त्यावेळी उपस्थिती कमी असल्यास त्याचे उत्तर संबंधित शाळांना द्यावे लागेल. क्षमतेपेक्षा एकही प्रवेश ज्यादा चालणार नाही, असेही माध्यमिक शाळांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

उपसंचालक स्तरावरून ठोस कार्यवाही नाही

कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बारावीच्या वर्गांसाठी बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नियम नवा नाही, पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही, याची पडताळणी उपसंचालक स्तरावरून जरूरी आहे. मात्र, त्याठिकाणाहून काहीच कार्यवाही होत नसल्याने आता नवीन पॅटर्न समोर येवू लागले आहेत. ‘महाविद्यालयात परीक्षेपुरताच प्रवेश घ्या अन् बिनधास्तपणे क्लासेसला जा’‌ असा ह नवा पॅटर्न आता उदयास आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

  • कनिष्ठ महाविद्यालये

  • ४२०

  • विद्यार्थी प्रवेश क्षमता

  • ७२,६००

  • विद्यार्थ्यांना हजेरीचे बंधन

  • ७५ टक्के

बोर्ड परीक्षेसाठी ७५ टक्के हजेरीचे बंधन

बोर्डाच्या परीक्षेसाठी शैक्षणिक वर्षातील किमान ७५ टक्के तो विद्यार्थी शाळेत किंवा महाविद्यालयात हजर असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्याला परीक्षेला बसता येत नाही, असा नियम आहे. कौटुंबिक किंवा काही वैयक्तिक कारणास्तव एखादा विद्यार्थी ६० ते ७५ टक्के दिवसच शाळेत आला असल्यास त्यासाठी त्याचा स्वतंत्र प्रस्ताव बोर्डाला पाठवून मान्यता घ्यावी लागते. पण, ‘नव्या पॅटर्न’मुळे बोर्डाकडे कमी उपस्थिती असल्याबाबतचे प्रस्ताव देखील वाढत आहेत, पण त्यासाठी आजारपणासह अन्य कारणे नमूद केली जातात, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले; महिन्याभरात 23,000 रुपयांनी स्वस्त आणि आज तर तब्बल... खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला प्रशासकीय मान्यता; 3 993 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

SCROLL FOR NEXT