sports sakal
महाराष्ट्र बातम्या

Police Sports Competition : पुण्यात ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने येत्या ७ ते १३ जानेवारी या कालावधीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने येत्या ७ ते १३ जानेवारी या कालावधीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने येत्या ७ ते १३ जानेवारी या कालावधीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलातील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे पावणेतीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली.

या पत्रकार परिषदेस अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांच्यासह पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, दीपक साकोरे या वेळी उपस्थित होते.

ही स्पर्धा राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१ आणि गट- २ याठिकाणी होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर, १३ जानेवारी रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यादिवशी पोलिस अधिकाऱ्यांच्या पत्नीसाठी फायरिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत १८ प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातून १३ संघ खेळणार असून, दोन हजार ८३३ पुरूष-महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांचा एकच संघ राहणार आहे.

स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू आणि संघ व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांची शहरात खासगी, शासकीय ठिकाणी निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला निवासस्थानापासून स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT