Out of one-sided love case the girl burnt the young man alive five people arrested  
महाराष्ट्र बातम्या

प्रेमप्रकरणातून तरुणीने युवकास जिंवत जाळले, नाशिक जिल्ह्यात खळबळ

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक (valentine week) साजरा केला जात आहे, दरम्यान नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणात युवकाला जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आली आहे. आज शुक्रवार (ता.११) रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे तालुकाभरात खळबळीचे वातावरण आहे.

लग्न मोडल्याचा राग

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथील प्लंबिंग व्यवसाय करणारा युवक गोरख काशिनाथ बच्छाव (वय ३१) याची रावळगाव ता. मालेगाव येथील युवती कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३) हिच्याशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली व नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून तिला लग्नाची मागणी होवू लागली. मात्र या प्रकारास कल्याणीच्या कुटूंबियांकडून विरोध असल्याने यातून वाद निर्माण होऊ लागले.

दरम्यान सदर युवतीचे लग्न इतर ठिकाणी जमत असले तरी हा विवाहसंबंध गोरखच मोडत असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबियांचा बळावत गेला. आज दुपारी साडेअकराच्या सुमारास सोनवणे कुटूंबीय लोहोणेर येथे आले मात्र झालेल्या चर्चेत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढला. त्याचे पर्यावसान म्हणजे सोनवणे कुटूंबीयाकडून गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली.

गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील एका दुकानात घुसला असता त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून कल्याणी हिने माचीसची काडी फेकल्याने गोरख पन्नास टक्के भाजला. त्यास तातडीने उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकारची देवळा पोलिसांनी तातडीने दखल घेत कल्याणी गोरख सोनवणे ( वय २३ ), गोकुळ तोंगल सोनवणे (वय ५७ ), निर्मला गोकुळ सोनवणे( वय ५२), हेमंत गोकुळ सोनवणे ( वय ३०) व प्रसाद गोकुळ सोनवणे (वय १८) सर्व राहणार बी.सेक्शन, रावळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगने व उपविभागिय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT