पुणे ः महाराष्ट्रात दरम्यानच्या काळात वाढलेले सार्वजनिक कार्यक्रम, नागरिकांनी कोरोनाकडे केलेले दुर्लक्ष आणि कोरोना विषाणूचा नवा ‘म्यूटंट’ यामुळे रूग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे, असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले आहे. रविवारी त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. आजवर गंभीर स्थितीत महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखवून देत आला आहे. आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रूपाने देशाला योग्य दिशा दाखविण्याची वेळ आली आहे. शासनाने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन करणे आणि स्वयंअनुशासन बाळगणे हेच कोरोना विरुद्ध लढण्याचे दोन शस्त्र आहे. कॅलिफोर्निया म्यूटेशन म्हणून ओळखले जाणारे ‘एल४५२आर’ आणि ‘इ४८४क्यू’ हे म्यूटेशन कोविडचा राज्यात मोठ्या प्रमाणवर प्रसार करण्यास कारणीभूत असल्याचे सुरवातीच्या निरीक्षणातून दिसत आहे, असे मांडे यांनी स्पष्ट केले.
डॉ. मांडे म्हणाले....
- जिल्हा पातळीवर नमून्यांच्या संकलनात अनियमितता
कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सींगसाठी पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) प्रयत्नशील आहे. त्यामध्ये आता राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा (एनसीएल) समावेश करण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक निधीही दिल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले. तसेच, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी जिल्हा पातळीवरून योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत नमुने मिळायला पाहिजेत, तसे होताना सध्या दिसत नाही. यासंबंधी संबंधितांना कळविणार असल्याचेही मांडे यांनी सांगितले.
- पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमीच
राज्यात काही लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. परंतू, त्यांची संख्या अत्यंत नगण्य असल्यामुळे सर्वांनाच पुन्हा कोरोना होईल, असे आता तरी सांगणे शक्य नाही.
- ‘लस’ प्रभावीच
देशात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसी या प्रभावी आहे. लसीकरणामुळे व्यक्तीला हॉस्पिटलायझेशनची गरज पडणार नाही. तसेच, तो अत्यवस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता नगण्य असेल. आजवर झालेल्या संशोधनाच्या आधारे आपण हे म्हणू शकतो.
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नागरिकांची जबाबदारी
आपली आरटीपीसीआर कोवीड टेस्ट जर पॉझिटिव्ह आली. तर नागरिकांनी मागील
तीन-चार दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला काळजी घेण्या संबंधी कळवायला हवे. अशा संपर्कात आलेल्या व्यक्तींनी निदान चार ते पाच दिवस क्वारंटाईन व्हायला हवे. कोरोनाची चाचणी करून नंतरच पुढचे व्यवहार करायला हवे
- निर्बंधांचा फायदा होईल का?
निर्बंध लादल्यामुळे किंवा लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूंचा प्रसाराचा वेग कमी होतो. बाधित व्यक्तीपासून फक्त कुटुंबातील लोकांना फार तर बाधा होईल. दरम्यान इतर व्यवस्था उभा करण्यास प्रशासनाला वेळ मिळतो. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था प्रभावित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.