Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

'जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच', मनसेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

'आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच'

दीनानाथ परब

मुंबई: नागपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (ncp mla amol mitkari) यांच्या बोचऱ्या टीकेनंतर मनसेचे (mns) नेते खवळले आहेत. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर (Raj thackeray) मनसेच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. मनसेच्या नेत्यांनी अमोल मिटकरी यांना इशारा देतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. "नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच. महाराष्ट्रात जाती जातीत (cast issue) विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच" असं टि्वट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी अलीकडेच 'राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा (cast issue) मोठा होत गेला' असं वक्तव्य केलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. काल पुण्यात बोलताना राज ठाकरेंनी आपणं आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं. "मी प्रबोधनकारांची पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत. मी जे बोललोय त्याच्याशी आजोबांचं काय संबंध?" असं राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT