महाराष्ट्र बातम्या

लॉकडाऊनचे नियम उल्लंघन प्रकरणी राज्यात लाखभर लोकांवर कारवाई! तब्बल इतक्या कोटींची वसुली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात दोन महिन्यांपासून जास्त कालावधीकरता लॉकडाऊन आहे. या बाबतच्या नियमाचा भंग केल्यामुळे राज्यात एक लाखपेक्षा लोकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात कोटी दंड वसूल झाला.  

महाराष्ट्रात 188 कलमाखाली एकंदर 1 लाख 24 हजार 369 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. 22 मार्चपासून यासंदर्भात झालेल्या कारवाईत 80 हजार 890 वहाने जप्त करण्यात आली. त्याचबरोबर एकंदर 6 कोटी 86 लाख 47 हजार 691 रुपयांचा दंड वसूल केल्याचे वृत्त आहे. याच कालावधीत पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल 846 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून विलगीकरणाचे नियम 722 जणांनी मोडले असल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते. त्याचबरोबर पोलिसांना लक्ष्य केल्याच्या 263 घटना घडल्या. त्यात एकंदर 86 जणांना दुखापत झाली. तर पोलिस नियंत्रण कक्षास कोरोनाबाबतचे एकंदर 1 लाख 1 हजार 97 कॉल आले होते. 

अवैध वाहूतक केल्याबद्दल 1 हजार 332 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्याबद्दल 23 हजार 986 जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांवर एकंदर 47 हल्ले झाले आहेत.  
राज्य सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला आहे, पण त्याचवेळी अनेक सवलती दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT