Rajesh Tope टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात; आरोग्य मंत्र्यानी दिली दिलासादायक माहिती

टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्साठी शासन पूर्ण क्षमतेनं काम करतेय - राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढतेय. मात्र कालची आकडेवारी फारशी दिलासादायक होती. याविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील रूग्णसंख्या कमी होत असल्याची माहिती दिली. रुग्णसंख्या कमी होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत, टेस्टचा अहवाल व्यवस्थित मिळाला तर रुग्णांची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकेल आणि त्यावर योग्य उपाययोजना करणे सोपं जाईल, असेही टोपे म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि खबरदारीच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमही वेगाने सुरु आहे. यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हॅक्सिन एक्सप्रेसचं उद्घाटन केलं. पुण्यातील ठिकठिकाणी जाऊन कोरोनाची लस दिली जात आहे. हा स्तुत्य उपक्रम असून त्याची व्याप्ती आणि लस देण्याची गती वाढवायची असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

शाळा सुरू करण्याबाबत कॅबिनेटमध्ये उद्या चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री, पालक, संस्था चालक, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ सदस्य यांचे विचार घेऊन उद्या निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सोबत निवडणूक निकालावर भाष्य करताना बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढलो नाही, वैयक्तिक लढलो आहोत, त्यामुळे चांगले निकाल यावेत अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

SCROLL FOR NEXT