Maharashtra Bhushan 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

धनश्री ओतारी

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अाप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ याने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. (Padmashri Appasaheb Dharmadhikari was honored Maharashtra Bhushan Award 2023 )

श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. अाप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमस्थळी धर्माधिकारी यांचे श्री सदस्यांनी मोठी गर्दी केली आहे. जवळपास 20 लाख भाविक याठिकाणी आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बैठक चळवळीचे प्रणेते दिवंगत महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजमनात आमूलाग्र बदल केले आहेत. समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाला सकारात्मक वाटेवर घेऊन जाण्याचे काम या चळवळीतून झाले आहे.

नानासाहेब धर्माधिकारी यांची समाजपरिवर्तनाची ही धुरा त्यांचे सुपुत्र अाप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी आठवड्याभरापासून श्री सदस्यांकडून श्रमदान केले जात आहे. यामागे प्रत्येक काम हे देशासाठी, स्वधर्मासाठी करत असल्याची भावना श्री सदस्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT