CM-Uddhav-Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

एका उमद्या सहकाऱ्याचं अवेळी निघून जाणं क्लेशदायक - CM ठाकरे

एका उमद्या सहकाऱ्याचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक असल्याचे सांगत त्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे

स्नेहल कदम

एका उमद्या सहकाऱ्याचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक असल्याचे सांगत त्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे मध्यरात्री हैदराबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, कोल्हापुरात त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. एका उमद्या सहकाऱ्याचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक असल्याचे सांगत त्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशी भावनकि पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

दरम्यान, कोल्हापुरात आज दुपारी १.०० ते १.३० पर्यंत काँग्रेस कमिटीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारीपर्यंत त्यांचे पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. आमदार जाधव यांच्या निधनाची बातमी एकूण धक्का बसला आहे. साधे आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व होते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

आमदार जाधव काही महिन्यापूर्वी मुंबईत छोटी शस्त्रक्रिया ही झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी आठवड्याभरापूर्वी त्यांना हैदराबादमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र पुन्हा इन्फेक्शन झाल्याने दोन दिवसापूर्वी आणखी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून आणि निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT