महाराष्ट्र बातम्या

Vidarbha Flood News: महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या ४५ जणांच्या सुटकेसाठी लष्कराचे हेलिकॉप्टर दाखल झाले

यवतमाळमध्ये पैनगंगेला महापुर, लोकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर नागपुरहून पोहोचले

सकाळ डिजिटल टीम

Flood in Yavatmal:महागाव तालुक्यातील अनंतवाडी तांडा येथे पूरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी एसडीआरएफ पथक दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरु आहे. हेलिकॅाप्टर नागपुरहून पोहोचले आहे. जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु होती. काल रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. पैनगंगेला महापुर आल्याने महागाव तालुक्यातील अनंतवाडी गावाला पुराचा वेढा बसला, त्यात 45 लोक अडकून पडले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी पोहोचली असून हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टरने लोकांना काढण्यात येणार आहे. नागपुरवरून हेलिकॉप्टर आल्यानंतर लोकांना तेथून काढायला सुरुवात झाली आहे.

शिवाय, जिल्ह्यातील नदीकाठावरील अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरले. बेम्बला प्रकल्प, अडान धरणातून पाणी सोडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सध्या यवतमाळबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्य अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती बघायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून पूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलं. या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली. या घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे. वातावरण खराब असल्याने या भागात हेलिकॉप्टर्स उतरु शकत नाही.

मुसळधार पावसाचा तडाखा मुंबई आणि नवी मुंबईलाही बसलाय. पावसामुळे बऱ्याच वेळा काही मार्गांवरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. तर नवी मुंबई येथे पावसाचा जोर जास्त असल्याने प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT