Kolhapur Violence 
महाराष्ट्र बातम्या

Kolhapur Violence :'राज्यातील शांतता बिघडविण्यात पाकिस्तानचा हात', रामदास आठवलेंचे वक्तव्य चर्चेत

हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात

धनश्री ओतारी

औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. संभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये अशी घटना घडलेल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच खासदार रामदास आठवले यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

राज्यातील शांतता बिघडविण्यात पाकिस्तानचा हात आहे की काय अशी शंका येत आहे. त्यामुळे अशा घटनांचा या दिशेने देखील सरकारने सखाेल तपास करावा अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी पीटीआय या वृत्त संस्थेशी बाेलताना व्यक्त केली आहे.

आठवले काय म्हणाले?

कोल्हापुरमधील घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असे मत खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. परंतु राज्यात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पाकिस्तानचा हात असू शकतो असेही आठवलेंनी नमूद केले. त्यादिशेने सरकारने तपास करायला हवा, असे आठवले यांनी म्हटलं आहे.

तसेच, मुस्लिम समाजाने औरंगजेबचा फोटो आणून शांतता बिघडविण्याचे काम करणे उचित नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकसंभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये रण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते.

शहराच्या अनेक भागांत दगडफेक, तोडफोडीने दंगल उसळली होती. त्यात दोनशेवर वाहने, दुकाने, टपर्‍या, घरांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी वारंवार लाठीमार केला.

जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या ३० पेक्षा अधिक नळकांड्या फोडाव्या लागल्या. सुमारे तीन तासांनी दंगल नियंत्रणात आली. दगडफेक, तोडफोडप्रकरणी ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Latest Marathi News Live Update: नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT