Kelva Beach Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

मुंबई : केळवे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू, सहल बेतली विद्यार्थ्यांच्या जीवावर

हे विद्यार्थी नाशिक येथून केळवा येथे फिरण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रकाश पाटील

पालघर : पालघरमधील केळवे समुद्रात बुडून नाशिक येथील तीन विद्यार्थाचा तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका स्थानिकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. तर दोन विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल केळवे येथे आली असताना ही घटना घडली. (Nashik students drown at kelva Beach)

केळवे समुद्रकिनारी नाशिक येथील प्रसिद्ध अ‍ॅकेडमीतील 39 जण सहलीसाठी आले होते. यात ११ मुली, २२ मुले आणि अ‍ॅकेडमीतील शिक्षकांचा समावेश होता. दुपारी काही मुले पोहोण्यासाठी समुद्रात गेले. शिक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दीडच्या सुमारास यातील पाच विद्यार्थी समुद्रात बुडाले. या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी एक स्थानिक तरुण समुद्रात गेला. मात्र, तो देखील बुडाला.

स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर चार जणांचा मृत्यू झाला. ओम विसपुते, दीपक वडाकाते आणि कृष्णा शेलार अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून ते तिघेही नाशिकचे आहेत. तर केळवे येथील अथर्व नागरेचा मृत्यू झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shops Rules: सोसायटीच्या संमतीशिवाय दारू विक्रीचं दुकान उघडता येणार नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा आदेश काय?

५,२२० एसटी गाड्यांंसह ४२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन, गौरी-गणपतीसाठी प्रशासनाचा निर्णय; विशेष सवलतींचीही घोषणा

IND vs SL Test: आता न्याय मिळणार... साई सुदर्शनच्या माघारीमुळे 'त्या' फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री होणार? त्याच्या पोस्टने उडवलेली खळबळ

IND vs SL Test : आधी जसप्रीत बुमराह, आता...! भारताच्या तगड्या फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार; मागील दोन सामन्यांत ठोकलेय शतकं...

सासूबाईंमुळेच मी माझ्या मुलीला डे केअरमध्ये ठेवत नाही... मृणाल दुसानिसने स्पष्टच सांगितलं; म्हणते- त्या नुरवीला

SCROLL FOR NEXT