Pali ballaleshwar temple sakal media
महाराष्ट्र बातम्या

पालीत हजारो भाविक दाखल; बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा

पाली : अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ (religious place) असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर (Ballaleshwar Ganpati temple) गुरुवारी (ता.७) दर्शनासाठी खुले झाले. त्यानंतर रविवारी (ता.२४) आलेल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला (sankashti chaturthi) दर्शनासाठी पालीत हजारो भाविक दाखल (devotees) झाले. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

राज्यभरातून भाविक पालीत दाखल झाले होते. गर्दी असल्याने येथील व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती.

पाली पोलिस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक एकच्या बाजूने वळविण्यात आली होती.

"संकष्टी रविवारी आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. खूप दिवसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे व्यवसायदेखील चांगला झाला."
- अमित वरंडे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

फक्त ६ एपिसोड पण सगळीकडे फक्त याच सीरिजची चर्चा! नेटफ्लिक्सवर येताच ठरली नं. १ ; तुम्ही पाहिलीत का?

Sunil Tatkare यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

SCROLL FOR NEXT