महाराष्ट्र बातम्या

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या महापूर पाहणी दौर्‍यावेळी ताफ्यातील पायलट गाडीचा अपघात झाला आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागठाणेजवळ अपघात झाल्याचं वृत्त आहे. दौर्‍यावेळी आडव्या आलेल्या दुचाकीला वाचवताना पोलीस गाडी घसरुन खांबावर आदळून हा अपघात झाला. या गाडीत असणारे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आष्टामधील रुग्णांलयात उपचार सुरु आहेत.

राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. पलुस तालुक्यातील नागठाणे येथील पूरग्रस्तांच्या पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यांच्यासोबत असलेली एस्कॉर्ट पोलीस गाडीला एक दुचाकी आडवी आली. दुचाकीला धडक बसण्यापासून वाचवत असताना पोलीस गाडी चिखलात स्लीप होऊन खांबास धडकली. गाडी धडकल्यानंतर जाग्यावर उलटली. या अपघातात पोलीस गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील पोलीस हवालदार सुर्वे व अन्य पोलीस कर्मचारी जखमी झाले.

अपघातानंतर मंत्री कदम यांनी तातडीने स्वतःच्या गाडीतून आष्टा येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये जखमी पोलिसांना उपचारास दाखल केले. त्यानंतर मंत्री कदम पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

SCROLL FOR NEXT