mantralay sakal media
महाराष्ट्र बातम्या

जुलै-ऑगस्टचे पंचनामे पूर्ण! अतिवृष्टीने २२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे राज्यातील २७ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार आणि फळबागांसाठी ३६ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे राज्यातील २७ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. जुलैचा पंचनामा अहवाल शासनाला सादर झाला आहे. नुकसानग्रस्तांना आता वाढीव मदत मिळणार आहे. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार आणि फळबागांसाठी ३६ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व सोलापूर या २७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १५ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पण, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रात वाढ झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून पंचनामे उरकण्यात आले असून त्याचा अहवाल आता कृषी विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. अधिवशेन संपल्यानंतर नुकसानीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार आहे. जुलैमध्ये २६ जिल्ह्यातील १८ लाख २१ हजार हेक्टर तर ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे सात जिल्ह्यातील तीन लाख ६० हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामे जुन्याच निकषांनुसार पार पडले असले, तरीदेखील शेतकऱ्यांना नवीन निकषांनुसार वाढीव मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना भरपाईपोटी साधारणत: १४ ते १६ हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

निर्णय जून २०२२ पासून लागू राहील

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो निर्णय जून २०२२ पासून लागू राहील. जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही या निर्णयानुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
- संजय धारुरकर, संचालक, मदत व पुनर्वसन

  1. मदतीची रक्कम व बाधित क्षेत्र
    जुलैमधील नुकसान
    १८.२१ लाख हेक्टर
    ऑगस्टमधील बाधित क्षेत्र
    ३.६० लाख हेक्टर
    जिरायतीसाठी हेक्टरी मदत
    १३,६००
    बागायतीसाठी हेक्टरी मदत
    २७,०००
    फळबागांसाठी हेक्टरी मदत
    ३६,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठे खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raj Thackeray: मुंबई पोलिसांच्या विनंतीला मान देत...; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल, राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT