In Pandharpur 16 citizens from Nanded Kolhapur district were taken into custody 
महाराष्ट्र बातम्या

निर्जला एकादशीनिमित्ताने आलेल्या 16 वारकऱ्यांना घेतले ताब्यात, सर्वांना केले क्वारंटाईन

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून आलेल्या 16 वारकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले. मोटरसायकल आणि अन्य खासगी वाहनांमधून हे वारकरी आज पंढरपूरला आल्याची माहिती पुढे येत आहे. या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करून क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे 17 मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. आता धार्मिक स्थळे उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली असली तरी त्याचे अधिकार राज्य शासनाकडे दिलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
त्यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 30 जूनपर्यत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून 16 वारकरी आज येथे दाखल झाले. अनेकांनी चंद्रभागेचे स्नान करुन नगरप्रदक्षिणा पूर्ण करुन मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेतले. हा सगळा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वीसहून अधिक वारकऱ्यांना रोखून प्रशासनाला कळविण्यात आले.
हे सगळे भाविक मोटर सायकल आणि खाजगी वाहनातून आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. हे सर्व वारकरी भाविक नांदेड, कोल्हापूर, नगर, सातारा, लातूर, उस्मानाबाद आदी भागातून आले आहेत. लॉकडाऊनचा नियम मोडून आलेल्या या वारकरी भाविकांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT