महाराष्ट्र बातम्या

'पांडुरंग' देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना; 'विठ्ठलराव शिंदे' साखर निर्यातीत प्रथम

सोलापूर जिल्ह्यातील 'पांडुरंग'व 'विठ्ठलराव शिंदे'या दोन साखर कारखान्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर झेंडा रोवला आहे.

प्रदीप बोरावके

माळीनगर,(जि. सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील 'पांडुरंग'व 'विठ्ठलराव शिंदे'या दोन साखर कारखान्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर झेंडा रोवला आहे. यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास तर विक्रमी साखर निर्यातीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास मिळाले आहे.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी या पुरस्काराची आज घोषणा केली.

देशातील सर्व २८४ सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते.त्याआधारे ऊस उत्पादकता,तांत्रिक गुणवत्ता,वित्तीय व्यवस्थापन,अधिकतम ऊस गाळप ,सर्वोत्तम साखर उतारा,सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे 2021 साठीची एकूण 21 पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.त्यापैकी सर्वाधिक 10 पारितोषिके एकट्या महाराष्ट्राने पटकावली आहेत.

यंदाच्या वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून 108 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला.त्यात महाराष्ट्र 46,उत्तर प्रदेश 13, तामिळनाडू 12,हरियाणा व गुजरात प्रत्येकी 10,पंजाब नऊ,कर्नाटक सात आणि मध्य प्रदेश व आंध्रप्रदेश प्रत्येकी एक कारखाने सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी पटकवलेली पारितोषिके-

० उत्कृष्ट ऊस उत्पादकता :

उच्च उतारा विभाग -प्रथम:श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना,शिरोळ,ज़ि कोल्हापूर, द्वितीय:राजारामबापू पाटील सहकरी साखर कारखाना,सांगली

० तांत्रिक कार्यक्षमता : उच्च उतारा विभाग - प्रथम:विघ्नहर सहकारी साखर कारखाना,पुणे, द्वितीय:डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सांगली

० विक्रमी ऊस गाळप:

उच्च उतारा विभाग:जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना,कोल्हापूर

० विक्रमी ऊस उतारा :

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना,सातारा

० अत्युत्कृष्ट साखर कारखाना :

उच्च उतारा विभाग:श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना,कागल (कोल्हापूर)

० विक्रमी साखर निर्यात-

प्रथम:विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना,पिंपळनेर

द्वितीय:पांडुरंग सहकारी साखर कारखाना,श्रीपूर

० देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना:श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना,श्रीपूर

कोविड परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या वर्षीचा व गतवर्षीचा पारितोषिक वितरण सोहळा नवी दिल्ली येथे 16 नोव्हेंबर 2021 रोजी एन.सी.यु आयच्या सभागृहात एकत्रित होणार आहे.

- प्रकाश नाईकनवरे,व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT