महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : ''मी मैदानात उतरणार अन् 'त्यांना' पाडणार'', पंकजा मुंडे थेटच बोलल्या

संतोष कानडे

बीडः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातलं वैर लपून राहिलेलं नाही. प्रत्येक वर्षीच्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे जाहीरपणे खदखद व्यक्त करत असतात. मंगळवारीही त्यांनी राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढला, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सत्तांतरावरुन त्यांनी खडे बोल सुनावले.

यावेळी पंकजा मुंडे यांनी, घराबाहेर पडण्याचा संकल्प जाहीर केला असून मी पडले परंतु इतरांना पाडण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चारित्र्यहिन, शेतकऱ्यांसोबत राजकारण करणारे, बेरोजारांचे प्रश्न न सोडवणारे आणि पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना मी पाडणार; असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कुणाकडे होता आणि स्वपक्षातील उमेदवारांच्या विरोधात पंकजा मुंडे काम करणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यापूर्वी पंकजा मुंडेंनी परळीएवढंच पाथर्डी मतदारसंघावर प्रेम केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्या पाथर्डीमधून निवडणूक लढवणार का? की निवडणूकच लढवणार नाहीत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पंकजा मुंडे म्हणाल्या...

  • मुंडे साहेब म्हणाले होते, एक दिवस असा येईन की तरुणांना व्यसनाधीन केलं जाईल

  • तुम्हाला मी मागच्या वर्षी तंबाखू सोडायला सांगितलं होतं

  • आज ड्रग्जमुळे मोठ्या प्रमाणावर तरुणाईचं नुकसान होत आहे

  • देश भ्रष्टाचारमुक्त झाला का? तुम्ही कुणाला मत देता आणि सरकार कुणाचं येतं

  • स्थिरतेसाठी मी काम करणार आहे

  • तुमच्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार

  • त्यासाठी मी मैदानात उतरणार

  • पडले ते झालं आता पाडणार आहे

  • जो चारित्र्यहिन असेल पैशाच्या जोरावर राजकारण करत असेल त्याच्याविरोधात काम करणार

  • जो शेतकऱ्यांच्या हिताचं राजकाण करत असेल त्याला पाडणार

  • जो बेरोजगारी नष्ट करु शकत नाही, त्याला पाडणार

  • मला काही मिळो न मिळो पुढच्या पिढ्यांसाठी काम करणार आहे

  • तुमच्या सेवेसाठी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार आहे

  • मी माझा आणि तुमचा स्वाभिमान मरु देणार नाही

  • सिंदखेडराजा, नगर, जळगाव, नाशिक, सिन्नर, येवला येथे मी जाणार आहे. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून जिथे जाता आलं नाही तिथं जाणार

  • आता घरी बसणार नाही, तुम्हाला मी मैदानात दिसणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT