Dasara Melava 
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: "आजकाल बघितलं तर स्वत:च्या वाढदिवसाचे बॅनर देखील..."; प्रीतम मुंडेचा निशाणा कोणावर?

Sandip Kapde

Dasara Melava:  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. यानंतर त्यांची कन्या आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनीही ही परंपरा पुढे चालू ठेवत भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास सुरुवात केली. दसऱ्याच्या भाषणात पंकजा मुंडे अनेकदा भावनिक आवाहन करताना दिसतात. दरम्यान पंकजा मुंडे बोलण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी सभेला संबोधित केले.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे भगवान गडावरुन घरी यायचे तेव्हा आम्ही त्यांचे औक्षण करत असे. ते आम्हाला सोन्याची काही वस्तू भेट देत असत. मात्र आज घरी गेल्यावर मुंडे साहेब नसतील.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला दिलेली लाखो सोन्याची माणसं ही आमची मोठी संपत्ती आहे. आम्ही लाखोंचा जनसागर कमावला आहे. गेली १० वर्ष पंकजा मुंडे संघर्ष करत आहेत.

भगवान बाबांनी दिलेला स्वाभिमान मुंडेसाहेबांनी आपल्याला कुठं गहान ठेऊ दिला नाही. आजकाल बघितलं तर राजकारणात स्वत:च्या वाढदिवसाचे बॅनर देखील स्वत:च्या पैशाने लावावे लागतात. मात्र पंकजाताईंच्या कारखान्यावर कारवाई झाली तेव्हा लोकवर्गणीतून मोठी वर्गणी गोळा करण्यात आली, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT