महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava : " मोनिकाताईंचा मतदारसंघ माझाच मानते'', पंकजा मुडेंच्या त्या वक्तव्यावरुन रंगल्या चर्चा

संतोष कानडे

बीडः बीडच्या सावरगाव घाट इंथ पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद जाहीर केली. सरकारचं सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे असलेलं दुर्लक्ष आणि आपल्यावर, आपल्या समाजावर होत असलेला अन्याय त्यांनी बोलून दाखवला.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ग्रामविकास मंत्री होते तेव्हा प्रत्येक गावात विकासकामं केली. प्रत्येक समाजाचा विचार करुन योजना राबवल्या. जेवढं प्रेम मी परळीवर केलं तेवढंच पाथर्डीवरही केलं. मोनिकाताईंचा मतदारसंघ हा मला माझाच मतदारसंघ वाटतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं वाढलेलं प्रस्थ आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपसोबत केलेली सत्तासोबत बघता पंकजा मुंडे पाथर्डीमधून आगामी निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी पंकजा मुंडे मतदारसंघ बदलणार, असं बोललं जात होतं. त्यामुळे त्या पाथर्डीमधून विधानसभा लढणार का? असा प्रश्न या विधानावरुन उपस्थित होत आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

  • शिवशक्ती परिक्रमा जेव्हा केली तेव्हा राज्यभर माझं सकल मराठा समाजाने, धनगर समाजाने, मुस्लिम समाजाने स्वागत केलं. हे स्वागत मला तेवढंच मोलाचं आहे जेवढं तुम्ही आज केलं.

  • कारखान्यावर रेड झाली तेव्हा ११ कोटी रुपयांचे चेक जमा झाले

  • तुम्ही उन्हात बसलात त्यामुळे मीसुद्धा उन्हात बसलेले आहे.

  • एकवेळ मला काही देऊ नका, परंतु माझ्या माणसाला सत्तेपासून त्यांच्या हक्कापासून दूर ठेऊ नका

  • या ठिकाणी मराठा, मुस्लिम, माळी, धनगर समाजाचेही लोक आलेले आहेत

  • विमा, अनुदान मिळालं का?

  • शेतमजुरी करणारे लोकं आहेत, आहे का त्यांना काम आहे का?

  • ऐकू येईना? कुणी कापली माझी वायर?

  • माझी वायर कुणी तोडली?

  • माझा आवाज आता कुणीही दाबू शकणार नाही

  • महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसींच्या मनात भीती असताना

    सरकारकडून समाजाला खूप अपेक्षा आहेत

  • मी तुम्हाला देऊ शकते फक्त आणि फक्त स्वाभिमान

  • माझ्याकडे शेवटचं पद ग्रामविकास होतं. गावागावत विकासाची कामं मला करता आली.

  • जेवढं परळीसाठी केलं तेवढंच पाथर्डीसाठी केलं.

  • मोनिकाताईंचा मतदारसंघ मी माझाच मानते

  • त्यामुळे त्यांच्याही मतदारसंघात सर्व समाजासाठी काम उभं केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT