Pankaja Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: '...सरकारने स्पष्ट करावे', लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी केली मागणी

Pankaja Munde: ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या आज नवव्या दिवशी राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बीड: राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राजकारण तापल्याचं चित्र आहे. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या आज नवव्या दिवशी राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीया एक्सवरती देखील पोस्ट शेअर केली आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत.

शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण करत असलेल्या लक्ष्मण हाके याची वडीगोद्री येथे जाऊन भेट घेतली. आधी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेले. पण, या भेटीबद्दल पंकजा मुंडे समाधानी नसल्याचे दिसले. कारण पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT