Eknath Shinde Cabinet Expansion esakal
महाराष्ट्र बातम्या

डावलण्यात आलेल्या पंकजा मुंडेंचे मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिलं ट्विट

धनश्री ओतारी

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या विस्तारात पंकज मुंडें याना डावलण्यात आलं आहे. सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत असतानाच पंकजा यांनी ट्वीट केले आहे.(Pankaja Munde first tweet after Eknath Shinde Cabinet Expansion)

मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना फोन आलेला नाही, अशी माहिती समोर आली. आणि पंकजा मुंडेच्या पत्ता कटच्या चर्चेला उधाण आल.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. 'नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना' अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे.

पंकजा मुंडेंचा पत्ता कट?

पंकजा मुंडे यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातही बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये तरी पंकजा यांना मंत्रीपद मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. इतर नेत्यांना फोन आल्याची चर्चा आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना फोन आला नसल्याचे सांगण्यात आले.

मंत्रींमंडळ विस्तारापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री सागर बंगल्यावर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले याची काही नावेदेखील समोर आली आहेत. मात्र, त्या यादीत पंकजा मुंडेंचे नाव नसल्याचे राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT