Pankaja Munde Makes a new tweet: 
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडेंचा 'स्वाभिमान' जागा झाला; केले नवे ट्विट

वृत्तसंस्था

मुंबई : भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यापासून फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत येत्या 12 डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे सांगितले होते. आता आज त्यांनी पुन्हा एक नवं ट्विट केले आहे. 

'12 डिसेंबर' रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना 'गोपीनाथ गड' येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या..वाट पहाते. असे ट्विट त्यांनी केले आहे. 

पंकजा मुंडे यांनी एक डिसेंबरला फेसबूक पोस्ट लिहून आधीच खळबळ निर्माण केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन भाजपचे नावही हटविले. आपण सर्वांनी 12 डिसेंबरला भेटू, तोपर्यंत मला वेळ हवा आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता 12 तारखेसा गोपीनाथ गडावर त्या काय खुलासा करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या भाजपच्या विभागीय बैठकीलाही त्या उपस्थित नव्हत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT