pankaja munde pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

'सरकारला ओबीसीच्या बाजूने बाजू मांडायचीच नव्हती'- पंकजा मुंडे

सध्या राज्यभर आरक्षणाचे मुद्दे गाजत आहेत. त्यात आता पंकजा मुंडेंनीही ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडली आहे

प्रकाश बनकर

औरंगाबाद: सध्या राज्यभर आरक्षणाचे मुद्दे गाजत आहेत. त्यात आता पंकजा मुंडेंनीही ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडली आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द देणारा निर्णय धक्कादायक आहे. या सरकारला ओबीसीच्या बाजूने बाजू मांडायचीच नव्हती म्हणून असा निर्णय आला असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

'सरकारने व्यवस्थित उपाययोजना न करता कोर्टात थेट आरक्षण जास्त झाल्याचे मान्य केले. सरकारने ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला असल्याचाही आरोप पंकजा यांनी केला आहे. आता कॅबिनेटने गट स्थापन करून ओबीसींना न्याय मिळवून द्यायला हवे. ओबीसी आरक्षण आणि जनगणनेचा यासोबत काहीही संबंध नसल्याचे मत मुंडे यांनी मांडले.

सरकारला दिशा देता येत नाही फक्त दिशाभूल करता येते, मराठा समाजाची बाजू मांडण्यात अपयश आले आणि ओबीसी बाबत सुद्धा हेच झालं त्यामुळं लोकांना आता हे सरकार आपलेसे वाटत नाही. राज्य सरकारने यावर मार्ग काढायला हवा. वाटलं तर मार्ग काढण्यासाठी आम्हाला बोलवा, किमान आम्हाला सूचना करण्याची तरी संधी द्या. सुप्रीम कोर्टात जाऊन सरकार हतबल झाले होते असंही पंकजा म्हणाल्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. तसेच EWS बाबत काढलेला जीआर मराठा समाजाला तरी मान्य आहे का? हे समाजाला विचारावे असा चिमटाही पंकजांनी सरकारला काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT