pankaja munde pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

२६ जूनचा 'चक्का जाम' ताकदीनिशी यशस्वी करा: पंकजा मुंडे

मुंडे म्हणाल्या, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे दुर्दैवी असून केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे

सकाळ वृत्तसेवा

बीड: ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात ता. २६ जूनला भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ताकदीने आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केले. 'चक्का जाम' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमती मुंडे यांनी मंगळवारी (ता. २२) भाजप पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला. खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमसेन धोंडे, आर. टी. देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, ओबीसी मोर्चाचे डॉ. लक्ष्मण जाधव आदी सहभागी झाले होते.

मुंडे म्हणाल्या, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे दुर्दैवी असून केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवावे लागेल. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने आपण यशस्वी केली आहेत, हे आंदोलनही यशस्वी करायचे आहे.

प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांसह आंदोलनात सहभाग घेऊन जिल्हा दणाणून सोडावा असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. प्रितम मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र मस्के यांनी केले. संचालन शंकर देशमुख यांनी केले. देविदास नागरगोजे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : जोतिबा डोंगरावर आज श्रावणषष्ठी यात्रा; महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येणार

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT