latest political news google
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडे म्हणाल्या, काही गैरसमज असतील तर फडणवीसांनी व्यक्त व्हावं

पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे का?

सकाळ डिजिटल टीम

पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे का?

सध्या राजकारणात घडामोडींचा वेग वाढला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांचे दौरे आणि गाठीभेटींनीही वेग घतेला आहे. दरम्यान, यानिमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासंदर्भातील एक वेगळी बातमी समोर येत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात विचारणा केली असता मुंढे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचा एक चांगला गुण आणि त्यांच्यासाठी कोणता सल्ला द्याल असे विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल किंवा गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. त्यांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक संकेत दिले होते. दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, या प्रश्नावर मुंडे म्हणाल्या, अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी एखादे गाणे म्हणण्याचा आग्रेह केला असता त्या म्हणाल्या, मी राजकारणात असल्याने गाणे गाण्याची गरज नाही, मात्र तरीही त्यांनी गायलेल्या गाण्यावर चर्चा सुरु आहे. 'हमारी मुठ्ठी मै आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा' या गाण्याच्या ओळी त्या गायल्या आहेत.

पंकजा मुंडे विधानपरिषदेत जाणार?

येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक आणि १० व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडेही या जबाबदारीसाठी इच्छूक आहेत. मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT