Pankaja Munde_Mahadev Jankar 
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडेंनी पुढच्यावेळी शासकीय हेलिकॉप्टरनं मेळाव्याला यावं; जानकरांनी व्यक्त केली अपेक्षा

जाहीर मेळाव्यातून थेट पंतप्रधान मोदींकडं केली मागणी

सकाळ डिजिटल टीम

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. बीडमधील सावरगाव इथं भगवानगडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात व्यासपीठावरुन ते बोलत होते. (Pankaja Munde should come to dasara melava by govt helicopter next time says Mahadev Jankar)

जानकर म्हणाले, "मोदी साहेबांना सांगितलं पाहिजे की, पंकजा ताईंच्या एका ट्विटवर लाखो लोक गोळा होतात. तिला या मंत्रीमंडळात संधी देण्याचा प्रयत्न करावा. पंकजाताई आणि महादेव जानकर नसेल तर तुमचं काही खरं नाही. मला माहिती आहे की मी सुजय विखेंच्या पक्षाचा मित्र पक्ष आहे. त्यामुळं माझाही तुमच्यावर हक्क आहे. माझी विनंती आहे की, जनतेच्या भावना जाणाव्यात. आज पंकजाताई स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन इथं आल्या आहेत. पुढच्या वेळी महाराष्ट्र शासनाचं हेलिकॉप्टर घेऊन यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो"

दरम्यान, गोपीनाथ गडावरून सावरगाव येथील भक्तीगडावर प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी रॅली काढली असून मेळाव्याला सुरूवात झाली आहे. यावेळी रासपचे नेते महादेव जानकर, सुजय विखे, प्रितम मुंडे, सुरेश धस हे उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: श्रीलंकेने ऐनवेळी मैदानात का उतरवला '१२ वा खेळाडू', ज्याचा मानव सुथारने पहिल्याच चेंडूवर केला गेम ओव्हर?

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास बुधवारपासून होणार सुरवात

मी दिलेला निर्णय शाश्वत, सिब्बल यांचे आरोप बिनबुडाचे! राहुल नार्वेकरांचं जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

FDA Crime : हॉटेल ‘चूल मटन’ला एफडीए चा दणका; स्वच्छता, आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्‍याने परवाना निलंबित

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT