Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा २४ तासांतच युटर्न; 'मला जे सूचत ते बोलते'

नाराजीच्या चर्चेला उधाण येताच...

धनश्री ओतारी

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे, असं वक्तव्य करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चेला उधाण आलं. अशातच त्यांनी आता त्याच्या वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे. मला जे सूचत ते बोलते, असं विधान करत नाराजी चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. (Pankaja Munde u-turn on statement I Belong To Bjp But About Her Party maharashtra politics)

मी त्या प्रसंगापुरतं बोलत असते त्यामुळे लोक अर्थ काढतात. मी ठरवून बोलत नाही जे सूचत ते बोलते. असं पंकजा मुंडे यांनी विधान केलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं चाललय तरी काय? अशी चर्चा रंगली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

जे मी नेहमी प्रमाणे सूचत ते मी बोलेण. राजकारणातल्या बदलावरही यावेळी भाष्य केलं. मी जे भाषण करते ते मी समोरच्यांना उत्साह, प्रेरणा देण्यासाठी. माझ्या वक्तव्याचा अर्थ अनेकजण चुकीचा काढतात. पण मी थांबत नाही. थकत नाही. आणि झुकत नाही. मी जे बोलते ते नेहमी त्या प्रसंगापुरतं बोलत असते. प्रत्येक ठिकाणी माझ भाषण वेगळं असतं.

पण साहजिक आहे की, जे आजुबाजूला घडतं त्यावरुन लोक त्याचा अर्थ काढत असतात. त्यात कुणाचा दोष नाही आणि मी दखलही घेऊ शकत नाही. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच... '

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे. अशी सूचक विधानं पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT