Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडे यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत

राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळविस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

धनश्री ओतारी

राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळविस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी मनातील खंतदेखील व्यक्त करुन दाखवली. यानंतर, राजकीय स्तरातून अनेक प्रतिक्रिया येत असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केलं आहे.(Pankaja Munde will get a big responsibility in future)

मुंडे यांच्या नाराजीवर दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. ' पंकजा मुंडे यांच्यापुढे मोठं भविष्य, वय आहे, त्यांना काम करत राहावं लागेलं. त्यांनी थोडी सबुरी पाळली पाहिजे, त्यांना योग्य सन्मान मिळेल. ' असे केसरकरांनी यावेळी सांगितले. केसकरांच्या या वक्तव्यानंतर राजकीय गोटात पंकजा यांना भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये योग्य संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

केसरकरांच्या या वक्तव्यापूर्वी, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले होते. त्यांनी मंत्रीपद हवे असेल तर वरिष्ठांची भेट घ्या असा सल्ला पंकजा यांना दिला होता.

नाराज पंकजा मुंडे काय म्हणाल्या...

काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपद न मिळाल्यावरुन जाहीर खंत व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, आज रक्षाबंधनचा दिवस आहे म्हणून राजकीय बोलणार नाही. सगळयांना माझ्या शुभेच्छा! राज्यात ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिला नसेल आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते देतील. माझं यावर काहीच म्हणणं नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT