MPSC Paper not leaked  
महाराष्ट्र बातम्या

पेपर फुटीच्या बातम्यांवर MPSC चं स्पष्टीकरण, ट्विटरवर दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपुरात एमपीएसची पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन देखील केले. पण, राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा कुठलाही पेपर फुटला नाही. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) दिलं आहे.

नेमके आरोप काय? -

नागपूरमध्ये पेपर फुटल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. पेपर फुटल्याचं सांगताना एका विद्यार्थ्यानं स्वत:चा पेपरसुद्धा दाखवला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सील केलेले पेपर फुटल्याचं दिसलं असाही दावा केला. पेपर फोडला तेव्हा केंद्राचे प्रमुखसुद्धा नव्हते. जेव्हा मला पेपर पारदर्शक कागदात दिसला तेव्हा शंका आली. आम्हाला मोबाईल नेता येत नाही. बॅगमधून मोबाईल घेऊन अभाविपच्या संपर्क साधून त्यांनी याबाबत विचारणा केली. इथल्या केंद्र प्रमुखांनी आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही असंही विद्यार्थ्याने यावेळी सांगितलं. आयोगाने असा प्रकार घडला असल्यास यात लक्ष घालावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अभाविपने पेपर फुटल्याचा आरोप करत नागपुरात आंदोलनही केलं. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावऱण निर्माण झालं होतं.

MPSC चं स्पष्टीकरण -

आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असं स्पष्टीकरण एमपीएससीनं दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT