Parambir Singh Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंग यांचा पगार थांबवला; फरार घोषित करण्याची तयारी सुरू

परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

सुधीर काकडे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांचा पगार थांबवण्याचा निर्णय राज्य सराकारने घेतला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर परमबीर सिंग यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीस लाऊन त्यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तरीही ते हजर न राहिल्याने आता त्यांना फरार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

अँटेलिया प्रकरणानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर पूढच्या काळात त्यांच्यावर देखील आरोप झाले. त्यांच्यावर मुंबई आणि ठाण्यामध्ये काही गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. परमबीर सिंग हे मे महिन्यात सुट्टीवर गेले होते, मात्र त्यानंतर ते अद्यापर्यंत परतलेले नाही. तसंच त्यांना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल गृहविभागाला देखील काहीच कळवलेलं नाही. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी नोटीस लावून त्यांना हजर राहण्यास सांगितले होतं. मात्र ते हजर राहिलेले नाहीत.

दरम्यान, अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारलाही सापडत नसलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा अखेर ठावठिकाणा लागल्याची चर्चा आहे. ते सध्या चंदीगडमध्ये असल्याचा अंदाज आहे. परमबीर सिंग यांनी चौकशी आयोगापुढं एक प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्याला जोडलेली पॉवर ऑफ अॅटर्नी ही चंदीगड शहरात तयार करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT